राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा, कार्यकर्त्यांसाठी मनसे बुक करणारे इतक्या ट्रेन

Raj Thackeray Ayodhya visit : राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा सध्या राज्यात चर्चेत आहेत. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे.

Updated: Apr 18, 2022, 07:15 PM IST
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा, कार्यकर्त्यांसाठी मनसे बुक करणारे इतक्या ट्रेन title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. ५ जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा (Ayodhya visit) असणार आहे. या अयोध्या दौऱ्यासाठी मनसे (MNS) कार्यकर्ते देखील उत्सूक आहेत. या अयोध्या दौऱ्यात कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्याना अयोध्येत जाण्यासाठी मनसेकडून ट्रेन बुक करण्यात येणार आहे. १० ते १२ ट्रेन बुक करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर या ठिकाणाहून या ट्रेन बुक केल्या जाणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे सेनेकडून या ट्रेन बुक करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात टायकून मानले जातात. भलेही राज ठाकरेंकडे सत्ता नसली किंवा निवडणुकीत पुरेसं यश मिळालं नसलं तरी राज्याच्या राजकारणात त्यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. त्यामुळेच अयोध्या दौ-यानंतर मनसे-भाजपातील समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यादरम्यान विशेष सुरक्षा केंद्र सरकार देणार आहे. राज यांच्या अयोध्या दौ-यावेळी PFIचे सदस्य गोंधळ घालू शकतात. त्यामुळेच राज ठाकरेंना विशेष सुरक्षा देण्य़ासाठी हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय.