राज ठाकरेंचं आणखी एक व्यंगचित्र, भाजपाला 'फटकारे'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकाच्या राजकीय घडामोडींवर व्यंगचित्र काढलं आहे.

Updated: May 22, 2018, 12:46 PM IST
राज ठाकरेंचं आणखी एक व्यंगचित्र, भाजपाला 'फटकारे' title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकाच्या राजकीय घडामोडींवर व्यंगचित्र काढलं आहे. या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी भाजपाला फटकारे लगावले आहेत. भाजपाच्या घशातून सत्ता खेचून आणल्याचं व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढलं आहे. राज ठाकरे यांच्याकडून मागील अनेक दिवसांपासून राजकीय घडामोडींवर ताशेरे ओढणारे व्यंगचित्र काढली जात आहेत. राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसते, तसेच सोशल मीडियावर देखील या व्यंगचित्रांवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. या व्यंगचित्रात जेडीएसचे कुमारस्वामी बाजूला उभे अमित शहा यांच्या घशातून काँग्रेस सत्ता बाहेर काढताना दिसत आहे.