Maharastra Politics: पवार म्हणतात जमिनीवर पाय ठेवा, फडणवीस म्हणतात हवेत कोण आहे? तर राज ठाकरेंचा वेगळाच सूर

एकमेकांचे हमसफर बनले. तर, एकत्र प्रवास करण्याआधी पवार-फडणवीस यांच्यातर कलगीतुरा रंगला होता. तर, राज ठाकरेआणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.

Updated: Jan 9, 2023, 01:26 PM IST
Maharastra Politics: पवार म्हणतात जमिनीवर पाय ठेवा, फडणवीस म्हणतात हवेत कोण आहे? तर राज ठाकरेंचा वेगळाच सूर  title=

Maharastra Politics: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज एकमेकांचे हमसफर बनले. तर, एकत्र प्रवास करण्याआधी पवार-फडणवीस यांच्यातर कलगीतुरा रंगला होता.  जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं अस म्हणत पवारांनी सरकारला कानपिचक्या दिल्या.  तर हवेत कोण हे त्यांनीच शोधावं असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिले. तर दुसरीकडे  मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांची (Ajit Pawar) चांगलीच जुगलबंदी पहायला मिळाली. 

एक उद्योग गेल्यानं फरक पडत नाही असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. तर उद्योग बाहेर गेल्यानं महाराष्ट्राचं नुकसान होत असल्याचा टोला अजित पवारांनी लगावला. जाती-धर्मात तेढ निर्माण करणं तसेच महापुरुषांना राजकारणात खेचणं अयोग्य असल्याचे म्हणत राजकीय परिस्थीतीवर राज ठाकरे यांनी सडेतोड भाष्य केले.

पवार विरुद्ध फडणवीस असा राजकीय कलगीतुरा पुन्हा पाहायला मिळाला. सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून काम करायचं असतं. अशा शब्दात शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलंय.. त्यावर हवेत कोण आहे त्यांनी शोधावं आणि सांगावं असा टोला फडणवीसांनी पवारांना लगावलाय.

विरोधी पक्षनेते अजित पवारांचा सत्ताधा-यांवर निशाणा

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सत्ताधा-यांवर निशाणा साधला आहे. सरपंच थेट निवडता मग मुख्यमंत्री, पंतप्रधान निवडा. राज्यातील जनतेला त्यांच्या मनातील मुख्यमंत्री निवडू द्या, सध्या सोयीचं राजकारण सुरू असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

उद्योगांवरुन राज ठाकरे आणि अजित पवारांमध्ये जुंपली

उद्योगांवरुन राज ठाकरे आणि अजित पवारांमध्ये जुंपलेली पाहायला मिळाली. महाराष्ट्र श्रीमंत राज्य आहे, एक उद्योग राज्याबाहेर गेला तर फरक पडत नाही असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात केलं होतं. राज ठाकरेंच्या याच विधानावर अजित पवारांनी टीका केलीय. एक जरी उद्योग बाहेर गेला तरी नुकसान होतं, अशी वक्तव्य करु नयेत असा टोला अजित पवारांनी लगावलाय.

सध्याची राजकीय स्थिती लयाला गेली असल्याची राज ठाकरेंची टीका

सध्याची राजकीय स्थिती लयाला गेलीय, सध्या सुरू असलेलं राजकारण नव्हे अशी टीका राज ठाकरे यांनी केलीय. कोणालाही आपण इतिहासतज्ज्ञ आहोत असं वाटू लागलंय असा टोला राज ठाकरेंनी पुण्यातील मुलाखतीच्या कार्यक्रमात लगावला. राणे, राऊत काय बोलले यात कोणाला रस नाही असं राज ठाकरे म्हणाले. जागतिक मराठी परिषदेत राज ठाकरेंची जाहीर मुलाखत झाली. त्य़ात राज ठाकरेंनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. महापुरूष, जातीवरून राजकारण करणं चूक आहे अशी टीका त्यांनी केली. 

पंतप्रधानांनी देशातल्या सर्व राज्यांना समान न्याय दिला पाहीजे - राज ठाकरेंची भूमिका

पंतप्रधानांनी देशातल्या सर्व राज्यांना समान न्याय दिला पाहीजे या भूमिकेचा राज ठाकरे यांनी पुनरूच्चार केला. आपण गुजराथी आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य हे चूक आहे असं राज यांनी सुनावलं. जागतिक मराठी परिषदेत राज ठाकरेंनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं.