मुंबईसह राज्यात येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

पावसाने मुंबईसह राज्यभरात मुसळधार हजेरी लावली आहे.

Updated: Sep 3, 2019, 11:11 AM IST
मुंबईसह राज्यात येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता title=

मुंबई : कालपासून पावसाने मुंबईसह राज्यभरात मुसळधार हजेरी लावली. मुंबईसह उपनगरांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. किंग्ज सर्कल, हिंदमाता, सायन परिसरासह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, येत्या ४८ तासांत मुंबई, कोकणसह राज्यात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पाणीटंचाईग्रस्त मराठवाड्यात चांगला पाऊस झाला आहे. नांदेडमधील धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे येथील पाण्याचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. परभणी, हिंगोली, गोंदिया येथेही चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तविल्या अंदाजानुसार मुंबई, कोकणसह महाराष्ट्रात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई उपनगरांत ठाणे, कल्याण, डोंबिवली भिवंडी, नवी मुंबईतही जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा परिणाम हा मध्य रेल्वे सेवेवरही झाला असून, रेल्वे गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहे. दरम्यान, येत्या ४८ तासांत मुंबईसह कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.