मुंबई : शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. यंदा मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे. केरळमध्ये २९ मे रोजी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी पुढच्या अकरा दिवसात असंच पोषक वातावरण असणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी ३० मे रोजी केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं होतं. पावसाचं आगमन वेळेवर झाल्यास पिकांना लाभ होतो, मात्र पाऊस लांबल्यास उत्पान्नात मोठी घट येते. स्कायमेट या खासगी संस्थेकडूनही हवामान व्यक्त केले जातात, पण प्रत्यक्षात त्यात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते.
दरवर्षी पावसाच्या अनुमानाचे अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केले जातात. पण मागील तीन ते चार वर्षापासून पावसाचं आगमन अंदाजापेक्षा उशीराने होत आहे. मागील ४ ते ५ वर्षापासून पावसाच आगमन लांबतंय, तसेच अनेक वेळा पाऊसमध्येच दडी मारत असल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.