मुंबईत रिमझिम पाऊस आणि सकाळी ढगाळ वातावरण

मुंबई, पुण्यासह उर्वरीत महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Updated: Dec 5, 2019, 11:04 AM IST
मुंबईत रिमझिम पाऊस आणि सकाळी ढगाळ वातावरण title=

मुंबई : मुंबई, पुण्यासह उर्वरीत महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईत आज सकाळपासून पावसाच्या काही सरीही कोसळल्या आहेत. अरबी समुद्रात आगामी २४ तासांत 'पवन' आणि 'अम्फन' ही चक्रीवादळं निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा इशारा देण्यात आलाय. मुंबई, पुणे, नाशिक या भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती होणं ही परिस्थिती दुर्मिळ मानली जाते. मुंबईतल्या सकाळच्या पावसाचा आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी घेतलेला आढावा..