पावसाचा तडाखा, पाणी घुसल्याने गणपती मूर्तीकारांचे नुकसान

वसईत पावसाने हजेरी लावली. याचा सर्वात मोठा फटका मूर्तिकारांना बसला आहे.

Updated: Jul 24, 2019, 11:34 PM IST
पावसाचा तडाखा, पाणी घुसल्याने गणपती मूर्तीकारांचे नुकसान title=
संग्रहित छाया

वसई : बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर हजेरी लावणाऱ्या पावसाचा त्रास सामान्य नागरिकांप्रमाणे देवालाही सोसावा लागत आहे. मंगळवारी रात्रीपासून वसईत पावसाने हजेरी लावली. रात्रीपासून पावसाचा जोर कायम असल्याने सकाळपर्यंत शहरात पाण्याचे साम्राज्य पसरले होते. याचा सर्वात मोठा फटका मूर्तिकारांना बसला आहे.

नालासोपाऱ्यातल्या चंदन नाका येथील गणपतीच्या मूर्ती बनविण्याच्या कारखान्यात पाणी घुसल्याने मूर्तीकारांचे मोठे नुकसान झालंय. चंदन नाका नालासोपारा येथे गणपती बनविण्याचे कारखाने आहेत. मंगळवारपासून कोसळणाऱ्या पावसाने या कारखान्यात पावसाचं पाणी शिरले. त्यामुळे गणपतीच्या सर्व मूर्ती पाण्यात भिजल्यात. यामुळे मूर्तीकारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.