रेल्वे २० हजार कोचेसचे करणार आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतर

वीस हजार कोचेसमध्ये तीन लाख वीस हजार बेडची क्षमता 

Updated: Mar 31, 2020, 06:21 PM IST
रेल्वे २० हजार कोचेसचे करणार आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतर title=

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेकडून वीस हजार रेल्वे कोचेसचे आयसोलेशन वॉर्ड मध्ये रूपांतर करण्याच्या तयारीत आहे. या वीस हजार कोचेसमध्ये तीन लाख वीस हजार बेडची क्षमता असेल रेल्वे च्या विविध विभागात याची तयारी सुरू आहे. सुरवातीला पाच हजार रेल्वे कोचेसच रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात येईल. त्यात ऐंशी हजार बेड समावण्याची क्षमता असणार आहे.

कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य सेवेच्या प्रयत्नांना पूरक बनविण्यासाठी मध्य रेल्वे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.  यामध्ये सध्या अस्तित्त्वात असलेल्या रेल्वे रूग्णालयांना कोविडची गरज भागविण्यासाठी सुसज्ज करणे, आपत्कालीन परिस्थितीची पूर्तता करण्यासाठी रुग्णालयाच्या खाटांची व्यवस्था करणे, प्रवाशांच्या डब्यांचे विलगीकरण कोचमध्ये बदल करणे इत्यादींचा समावेश आहे. परळ आणि माटुंगा येथील कार्यशाळाही या प्रयत्नात आपल्या समर्थ कार्यासह उभे ठाकले आहेत.

परळ कार्यशाळा: 
• ४५० नग  मास्क अद्याप पर्यंत शिवण्यात आले आहेत. 
• एनएबीएल मान्यताप्राप्त सीएमटी लॅबमध्ये १४० लिटर हँड सेनिटायझर तयार केले आहे.

माटुंगा कार्यशाळा: 

•‍ रूग्णालयातील कर्मचार्‍यांसाठी २०० स्क्रब अ‍ॅप्रॉनची व्यवस्था केली असून ती भायखळा येथील रेल्वे रूग्णालयाकडे सुपूर्द केली आहे. 
• रेल्वे रूग्णालयात रूग्णांची गरज भागवण्यासाठी १० स्ट्रेचर तयार केले गेले आहेत. 
• २०८० नग मास्क अद्याप पर्यंत शिवण्यात आले आहेत. 
• २३५ लीटर हँड सॅनिटायझर चाचणी मानकांनुसार तयार करण्यात आले आहेत.

माटुंगा वर्कशॉपमध्ये आयसीएफ कोचचे आयसोलेशन वॉर्डमध्ये रूपांतरण सुरू झाले आहे. रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोचमध्ये बदल केले जात आहेत.