सोनू सूदला पोलिसांनी वांद्रे टर्मिनल्सला जाण्यापासून रोखलं

स्थलांतरीत मजुरांसाठी 'देवदूत' ठरला सोनू सूद 

Updated: Jun 9, 2020, 09:21 AM IST
सोनू सूदला पोलिसांनी वांद्रे टर्मिनल्सला जाण्यापासून रोखलं  title=

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीतांचे मजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. या मजुरांसाठी अभिनेता सोनू सूद हा अगदी 'देवदूत' ठरलेला आहे. अभिनेता सोनू सूदने आतापर्यंत अनेक मजुरांना आपापल्या गावी, घरी सोडलं आहे. बसेसच्या माध्यमातून आतापर्यंत १२ ते १३ हजार मजुरांना सोनूने घरी जाण्याची व्यवस्था करून दिली आहे. मात्र सोमवारी सोनू सूदला पोलिसांनी वांद्रे टर्मिनल्सला जाण्यापासून रोखलं आहे. 

सोनू सूद आतापर्यंत अनेक मजुरांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर जाऊन त्यांची भेट घेत होता. पण सोमवारी पहिल्यांदाच सोनू सूदला आरपीएफ जवानांनी वांद्रे टर्मिनल्सला जाण्यापासून रोखलं आहे. (सोनू सूदच्या मातोश्री भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला) 

सोमवारी उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या मजुरांची सोनू सूद भेट घ्यायला गेला होता. मात्र तेथे जाण्यास पोलिसांनी रोखल्यामुळे सोनूने त्यांना बाहेरूनच निरोप दिला. रविवारी सोनू सूदने मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.  (सोनू सूदकडे मदतीची मागणी करणारे ट्वीट डिलीट होतायत, हे आहे कारण) 

सोनू सूद यांच्या मदतीवरून राजकारण सुरू झालं आहे. भाजप-शिवसेना सोनू सूदच्या मुद्यावरून आमनेसामने आली आहे. सोनू सूदने पहिल्यांदा रविवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याअगोदर मराठीतून ट्विट केलं. या ट्विटची देखील जोरदार चर्चा रंगली आहे. (मुख्यमंत्र्यांच्या भेटीअगोदर सोनू सूदचं मराठीत ट्विट) 

कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी सोनू सूदने आर्थिक मदत केली. यावरून संजय राऊत यांनी सोनू सूदवर निशाणा साधला. सोनू सूदला दत्तक घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय व्होटबँकेचं राजकारण सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी सामनामधून केली. यानंतर सोनू सूदच्या बचावासाठी भाजपने पुढाकार घेतला. हे वाचा : सोनू सूदच्या बचावासाठी भाजपचा पुढाकार... राऊतांना चोख प्रत्युत्तर