हा स्पर्धक थेट 'बिग बॉस ११'च्या फायनलमध्ये

  टीव्ही रिअॅलीटी शोमध्ये पॉप्यूलर असलेला 'बिग बॉस ११' सध्या अंतिम चरणात आहे. दरम्यान एक स्पर्धक थेट फायनलमध्ये गेल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. 

Updated: Dec 29, 2017, 08:24 AM IST
हा स्पर्धक थेट 'बिग बॉस ११'च्या फायनलमध्ये title=

मुंबई :  टीव्ही रिअॅलीटी शोमध्ये पॉप्यूलर असलेला 'बिग बॉस ११' सध्या अंतिम चरणात आहे. दरम्यान एक स्पर्धक थेट फायनलमध्ये गेल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. 

वायरल होत असलेल्या बातमीनुसार पॉप्यूलर स्पर्धक शिल्पा शिंदेने 'बीबी बास्केट' टास्क जिंकला असून तिला नवा कॅप्टन बनविण्यात आले आहे. 
  

'पॉईंट्ससाठी नाही..मनापासून'

या टास्कमध्ये आपल्या खाजगी वस्तूंनी एक बास्केट सजवायचे होते. यामध्ये शिल्पाने दिवगंत वडिलांचा फोटो भावाने दिलेल्या फ्रेममध्ये लावते.

मी है पॉईंट्स जिंकण्यासाठी करत नाहीए तर मनापासून करत असल्याचे शिल्पाने सांगितले. 

 

शिल्पा 'फिनाले वीक'मध्ये 

 बातम्यानुसार शिल्पाचे बास्रेट शेजाऱ्यांना सर्वाधिक आवडले आहे. त्यानंत तिला कॅप्टन म्हणून निवडण्यात आले आहे. हा टास्क जिंकल्यानंतर शिल्पाला डायरेक्ट 'फिनाले वीक'मध्ये जाण्याची संधी मिळाली आहे.

म्हणजेच या सिझनच्या फायनलमध्ये जाणारी ती पहिलीच स्पर्धक ठरली आहे. शिल्पाला शो जिंकणारी प्रबळ दावेदार मानले जाते. तिला प्रक्षकांचीही चांगलीच पसंती आणि वोट्स मिळत आहेत.