महापालिका आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर प्रविण परदेशींचा रजेसाठी अर्ज

प्रविण परदेशींचा पदभार स्वीकारून रजेचा अर्ज 

Updated: May 9, 2020, 03:12 PM IST
महापालिका आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर प्रविण परदेशींचा रजेसाठी अर्ज title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तपदावरून उचलबांगडी झालेल्या प्रविण परदेशी यांनी रजेसाठी अर्ज केल्याची माहिती हाती आली आहे. ई मेलद्वारे परदेशी यांनी सरकारकडे रजेसाठी अर्ज केला आहे. प्रविण परदेशींनी बदली झाल्यानंतर नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर रजेचा अर्ज केला. परदेशी यांची बदली नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदी झाली होती. 

परदेशींनी केलेला अर्ज अद्याप स्वीकारला गेलेला नाही. आज आणि उद्या मंत्रालयाला सुट्टी आहे, त्यामुळे परदेशींचा रजेचा अर्ज सोमवारी स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. परदेशी यांच्या बदलीमागे मुख्य सचिव अजय मेहता आणि त्यांच्यात असलेले मतभेद कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

त्याचबरोबर मुंबईतील हाताबाहेर जाणारी कोरोनाची स्थिती, प्रशासनात नसलेला समन्वय, आरोग्य व्यवस्था सुधारण्यात आलेलं अपयश, लॉकडाऊनबाबत काढलेले वेगवेगळे आदेश यावरून मुंबईत गोंधळाच वातावरण आहे. त्यातच सायन रुग्णालयात रुग्णांच्या वॉर्डमध्ये कोरोनाचे मृतदेह ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि  मुंबई महापालिका आणि राज्य सरकावर जोरदार टीका होऊ लागली. परदेशींच्या बदलीचे हे तत्कालीन कारण ठरलं. आता नाराज असलेल्या परदेशींनी रजेसाठी अर्ज टाकला, त्यापुढे ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकार आणि प्रशासनात समन्वय नसल्याचे आढळून आले. यावरुन राज्य सरकारवर विरोधकांनी टीका देखील केली. या पार्श्वभुमीवर प्रविण परदेशी यांची बदली करण्यात आली. 

कोरोना काळात समन्वय पालिका प्रशासनाकडू समन्वयाचा अभाव दिसला. आरोग्य सेवा सुधारण्यात अपयश दिसले. महापालिका रुग्णालयांमधील गैरसोयींबद्ल अनेक तक्रारी समोर आल्या. यासाठी आयुक्तांना जबाबदार धरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.