मुंबई : मुंबईत मंगळवारी निर्माण झालेल्या जलसंकटावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.
अतिवृष्टीमुळे मुंबई कोलमडली मात्र त्याला केवळ शिवसेना जबाबदार नसून एमएमआरडीए आणि इतर यंत्रणाही जबाबदार असल्याचा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी केलाय.
तर गेली २० वर्षे उपभोगून जर हीच परिस्थिती राहणार असेल तर शिवसेनेला पालिकेत सत्तेवर बसायचा काही अधिकार नाही, अशी खरमरीत टीका सोमय्या यांनी केलीय.
दुसरीकडे, पावसात मुंबई बुडाली याला सर्वस्वी महापालिका सत्ताधारी आणि पहारेकरी भाजप जबाबदार आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलाय. हजारो कोटींची कामं केल्याचा दावा सत्ताधारी करत होते मग मुंबई तुंबली कशी? असा प्रश्न त्यांनी विचारला. हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्तींची समिती गठीत करून चौकशी करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.
मुंबईत कालच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला @MCGM_BMC सत्ताधारी @ShivSena आणि पहारेकरी भाजपा हेच जबाबदार आहेत #MumbaiRains 1/3 pic.twitter.com/NFpviMVFXl
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 30, 2017
@uddhavthackeray जी म्हणत होते पाणी तुंबणार नाही मग काल काय झाले ? कुठे गेली हजारो कोटी रुपये खर्च करून केलेली कामे ?
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 30, 2017
मुंबईकरांच्या मदतीला मुंबईकर येतो, सत्ताधारी आणि पहारेकरी नाही हेच काल दिसले अन मुंबईकरांचा @MCGM_BMC का भरोसा नाय हे ही स्पष्ट झाले. 3/3
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 30, 2017