मुख्यमंत्र्याच्या पत्नी अमृता यांच्या कॉन्सर्टची तिकीटे विकण्याचे पोलिसांना आदेश !

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांच्या कॉन्सर्टची तिकीटे पोलिसांना विकण्यास सांगितल्याचा बातम्या कानी आल्या आणि वादाला तोंड फुटले. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 16, 2017, 09:09 AM IST
मुख्यमंत्र्याच्या पत्नी अमृता यांच्या कॉन्सर्टची तिकीटे विकण्याचे पोलिसांना आदेश ! title=

मुंबई: महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांच्या कॉन्सर्टची तिकीटे पोलिसांना विकण्यास सांगितल्याचा बातम्या कानी आल्या आणि वादाला तोंड फुटले.

वृत्तानुसार अमृता या 'पोलीस रजनी' कार्यक्रमाच्या सद्भावना दूत आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन ओरंगाबाद पोलीस करत आहेत. या कार्यक्रमाच्या तिकीटाची किंमत ५१,००० असून कार्यक्रमासाठी फक्त ४०० सीट असतील. 
काँग्रेसने मंगळवारी औरंगाबाद पोलीस आयुक्त यांना याबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

प्रदेश कांग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत यांनी सांगितले की, ''कोणाच्या आदेशावरून पोलिसांना तिकीट विकण्यास सांगितले आहे, हे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट करावे. तसंच याची जबाबदारी कोणाची ? याचे देखील स्पष्टीकरण द्यावे. 
त्यानंतर औरंगाबाद पोलीसांपैकी एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, लाईव्ह कॉन्सर्टची तिकीटे विकण्यास १५ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सांगितले होते.