'मेट्रो ३'चं काम रखडणार? आज पुन्हा सुनावणी

मेट्रो - ७ करता पश्चिम द्रुतगती महामार्गावरील २१६ झाडांच्या कत्तलीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिलीय.

Updated: Sep 15, 2017, 11:21 AM IST
'मेट्रो ३'चं काम रखडणार? आज पुन्हा सुनावणी  title=

मुंबई : मेट्रो - ७ करता पश्चिम द्रुतगती महामार्गावरील २१६ झाडांच्या कत्तलीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिलीय.

दहिसर ते अंधेरी दरम्यानच्या मेट्रोच्या कामात अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या कत्तलीकरिता एमएमआरडीएनं हारकोर्टात परवानगीसाठी याचिका केली होती.

मुंबई मेट्रोचं काम थांबवणं हा कोणत्याही समस्येवरील पर्याय ठरू शकत नाही, याचा पुनरुच्चार करत मुंबई उच्च न्यायालयानं मेट्रो ही काळाची गरज असल्याचं स्पष्ट केलंय... 

तर दुसरीकडे मेट्रो 3 मुळे फोर्ट परिसरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतींना धोका असल्याचा दावा करत 'जे एन पेटीट' या संस्थेनं हायकोर्टात धाव घेतली. यावर सुनावणी करताना आयआयटी मुंबईकडून हायकोर्टाच्या इमारतीची मेट्रो 3 च्या संदर्भात पाहणी करण्यात येईल, असं हायकोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं.

मात्र लोकांनी उगाच विरोधाला विरोध करू नये असा सल्लाही कोर्टानं दिला. आज या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे.