मुंबई : कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने प्रत्येक वार्डात लस केंद्र सुरू करावे, असे सांगितले होते त्यानुसार केले जात आहे. 18 ते 44 वयोगटासाठी सध्या लस बंद असली तरी जे लसीकरण सुरू आहे ते योग्य पद्धतीने सुरू राहील. दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले गेले पाहिजे. दरम्यान, आपल्याकडे 20 हॉस्पिटल आणि 240 अधिक लसीकरण केंद्र आहेत. जास्त रुग्ण असलेले राज्य लवकर कोरोनापासून मोकळे व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्या पहिल्या कंपन्या टेंडर बाबत पुढे येतील त्यांना प्राधान्य दिले जाईल. तसेच लोकांना लस लवकर मिळावी यासाठी टेंडर करण्यात येत आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. दरम्यान, मुंबईत म्युकरमायक्कोसिसचे रुग्ण (बुरशीजन्य आजार) आढळले असून पादुर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्या म्हणाल्या.
कोविड रुग्णांवर उपाचर सुरु आहेत. कोविड रुग्ण कमी होत असताना आता म्युकरमायक्कोसिसचा पादुर्भाव होत असल्याचे पुढे आले आहे. हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. म्युकरमायक्कोसिसचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, हे 111 रुग्ण हे बाहेरचे आहेत. कोविड लसबाबात आपण जागतिक स्तरावर निविदा काढली आहे. जागतिक स्तरावर ग्लोबल टेंडर काढलेली आपली पहिली महानगरपालिका आहे. Icmr च्या नियमाद्वारे हे टेंडर घेतले जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी दिली. ज्या पहिल्या कंपन्या टेंडर बाबत पुढे येतील त्यांना प्राधान्य दिले जाईल. लोकांना लस लवकर मिळावी यासाठी टेंडर करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
कर आणि खर्च टेंडर घेणाऱ्यांनी करावे कोल्ड स्टोरेज आमच्याकडे आहेत. पण जर वॉर्डसना आणखी स्टोरेज हवं असेल तर त्यांनी स्वतंत्र स्टोरेज बनवावे. वर्क ऑर्डरमध्ये कंपनीने काम व्यवस्थित केले नाही तर त्यांना बाहेर काढू शकतो. सर्वांना नियम सारखे असतील, असा इशारा महापौरांनी यावेळी दिला. आपल्याकडे 20 हॉस्पिटल आणि 240 अधिक लसीकरण केंद्र आहेत. जास्त रुग्ण असलेले राज्य लवकर कोरोनापासून मोकळे व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
ड्राईव्ह इन लसीकरणासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हाय प्रोफाईल लोक आपल्या महागड्या गाड्यांमधून येऊन लस घेत आहेत. सचिन तेंडुलकर यांनीही अशाच पद्धतीने लस घेतली, अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली.
दरम्यान, ग्लोबल टेंडरसाठी तांत्रिक अडचणी येऊ शकतात. पण यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करणे गरजेचे आहे. रशियाची स्पुटनिक लस भारतात आण्यासाठी रेडिज फार्माने पुढाकार घेतला होता पण त्यांना डोमेस्टिक लायसन्स दिले नाही आहे. हाफकिनला लस निर्मितीची परवानगी दिली आहे, पण ज्या जागेवर हाफकिन आहे, तो लोकवस्तीचा भाग असल्याने अडचण निर्माण होत आहे, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.