शिक्षकांवर शिक्षणेतर जबाबदाऱ्यांचे ओझे

शाळांच्या गुणवत्तेवर शिक्षकांचे प्रमोशन अवलंबून असेल असा शासन निर्णय नुकताच राज्य सरकारने जारी केला. याला राज्यभरातील शिक्षकांचा विरोध होत असताना आता वर्षभरात शिक्षकांना देण्यात येणा-या अशैक्षणिक कामांनाही विरोध होण्यास सुरुवात झालीय. दर आठवड्याला शिक्षकांना नविन परिपत्रक देण्यात येत असून नवीन कामांची यादी त्यात देण्यात येतेय. त्यामुळे शिकवायचे कधी असा सवाल आता शिक्षक विचारतायत

Updated: Nov 6, 2017, 07:30 PM IST
शिक्षकांवर शिक्षणेतर जबाबदाऱ्यांचे ओझे title=

दिपाली जगताप, झी मीडिया, मुंबई : शाळांच्या गुणवत्तेवर शिक्षकांचे प्रमोशन अवलंबून असेल असा शासन निर्णय नुकताच राज्य सरकारने जारी केला. याला राज्यभरातील शिक्षकांचा विरोध होत असताना आता वर्षभरात शिक्षकांना देण्यात येणा-या अशैक्षणिक कामांनाही विरोध होण्यास सुरुवात झालीय. दर आठवड्याला शिक्षकांना नविन परिपत्रक देण्यात येत असून नवीन कामांची यादी त्यात देण्यात येतेय. त्यामुळे शिकवायचे कधी असा सवाल आता शिक्षक विचारतायत

शिक्षकांची अशैक्षणिक कामं तुम्ही ऐकली तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. दर महिन्याला एखादे नविन काम शिक्षकांना सांगण्यात आले नाही तर नवलंच...आणि याच कारणामुळे राज्यभरातील सर्वच शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात असून हिवाळी अधिवेशनादरम्यान अशैक्षणिक कामांचा जोरदार विरोध शिक्षकांकडून करण्यात येणारेय..

केंद्र सरकारच्या निकषांनुसार शाळेला अ दर्जा नसेल तर शिक्षकांना प्रमोशन मिळणार नाही असं नुकतंच शिक्षण मंडळाने जाहीर केलं. तर दुस-या बाजूला अशैक्षणिक कामांनी शिक्षकांना हैराण केलंय. त्यामुळे शाळांचा दर्जा कसा सुधारायचा? दोन्ही बाजूंनी शिक्षकांचीच गळचेपी होतेय अशी तक्रार राज्यभरातल्या शिक्षकांकडून केली जातेय. 

विद्यार्थ्यांना महत्वाच्या दिवसांची माहिती व्हावी आणि विविध कार्यक्रमांद्वारे त्यांच्याही कौशल्य गुणांमध्ये वाढ होणं गरजेचे आहे. पण शाळांच्या सुट्ट्या पाहता आणि विविध प्रकारचे दिवस साजरे करण्यात जाणारा वेळ पाहता शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे होणारं दुर्लक्ष नाकारता येणार नाही. त्यामुळे राज्यातल्या शिक्षकांचा वेळ नेमका कशात जातोय याची पडताळणी शिक्षण विभागाने करणं गरजेचे आहे.