मुंबई : आपल्या बंगल्यावर पोलिसांची हेरगिरी सुरू असल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील चांगलेच संतापले आहेत.
याप्रकरणी थेट राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचं विखेंनी सांगितलं. विरोधी पक्षनेत्यांचे फोनही टॅप होत असल्याचा आरोप विखेंनी केला.
विखे-पाटील यांच्या बंगल्यावर पत्रकार परिषद सुरू होती. या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले दोन अनोळखी इसम पत्रकारांचे फोटो काढत होते. त्यांची माहिती घेतली असता ते विशेष शाखेचे पोलीस असल्याचे निष्पन्न झाले. हा गंभीर प्रकार समोर येताच विरोधी पक्षनेत्यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन करून यासंदर्भात विचारणा केली. त्यावर त्यांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले.