मद्याची ऑनलाईन आणि घरपोच विक्री, मुख्यमंत्री म्हणतात...

मद्यप्राशन करुन वाहन चालवल्याने होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय

Updated: Oct 15, 2018, 12:40 PM IST
मद्याची ऑनलाईन आणि घरपोच विक्री, मुख्यमंत्री म्हणतात... title=

मुंबई: दारुची ऑनलाईन विक्री करण्यासाठी राज्य सरकारकडे अनेक अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याला दुजोरा दिला असला तरी याबाबत कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

तुर्तास दारूची घरपोच विक्री करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. मुंबईमध्ये ३५ दुकानदारांनी अशा प्रकारे व्हॉट्सऍपच्या माध्यमातून विक्रीला सुरुवात केली होती. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घरपोच दारुची सुविधा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असल्याचे वृत्त फेटाळून लावले. 

मद्यप्राशन करुन वाहन चालवल्याने होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारने घरपोच दारुची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झाले होते. यावर अनेकांनी आक्षेप घेत सरकारला दबाव आणला होता.