एअर हॉस्टेस विमानातून पडली खाली; प्रकृती गंभीर

विमान हवेत जवळपास ३० फुटांपर्यंत झेपावले होते.

Updated: Oct 15, 2018, 11:08 AM IST
एअर हॉस्टेस विमानातून पडली खाली; प्रकृती गंभीर title=

मुंबई: मुंबई विमानतळावर सोमवारी एअर इंडियाच्या विमानातील हवाई सुंदरी विमानातून खाली पडून जखमी झाली. हर्षा लोबो असं या कर्मचाऱ्याचे नाव असून बोईंग विमानाचा दरवाजा उघडला गेल्याने त्या खाली पडल्या. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

एअर इंडियाचे एआय-८६४ हे विमान मुंबईवरून दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. विमानाने धावपट्टीवर वेग पकडला असताना एल-५ दरवाजा अचानकपणे उघडला गेला. त्यावेळी विमान हवेत जवळपास ३० फुटांपर्यंत झेपावले होते. त्यामुळे हर्षा लोबो गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

या घटनेविषयी एअर इंडियाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.