रेल्वे स्थानकावरील वन रुपी क्लिनिक बंद, भाजप खासदाराची तक्रार

भाजप खासदारानं केलेल्या तक्रारीमुळे मध्य रेल्वेच्या १२ स्थानकांवर सुरू असलेली वन रूपी क्लिनिक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईतील एका भाजप खासदाराने वन रुपी क्लिनिकला विरोध कोला होता. 

Surendra Gangan Updated: Apr 3, 2018, 02:22 PM IST
रेल्वे स्थानकावरील वन रुपी क्लिनिक बंद, भाजप खासदाराची तक्रार title=

मुंबई : भाजप खासदारानं केलेल्या तक्रारीमुळे मध्य रेल्वेच्या १२ स्थानकांवर सुरू असलेली वन रूपी क्लिनिक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईतील एका भाजप खासदाराने वन रुपी क्लिनिकला विरोध कोला होता. 

संबंधित खासदारानं याबाबत रेल्वेमंत्र्यांकडं तक्रारही केली होती. त्यामुळं दबावाखाली आलेलं मध्य रेल्वे प्रशासन वन रूपी क्लिनिकला सहाय्य करत नव्हतं. त्यामुळं नाइलाजानं ते बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागतोय, असा आरोप क्लिनिक चालवणारे मॅजिक दिल संस्थेचे डॉ. राहुल घुले यांनी केलाय. 

गेल्या वर्षभरात वन रूपी क्लिनिकमध्ये ५० हजारांहून अधिक प्रवाशी रूग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात आली. ३ महिलांची प्रसुतीही करण्यात आलीय. २० ते २५ हार्ट अटॅक आलेल्या रूग्णांवर तात्काळ उपचार करून प्राण वाचवण्यात आले. मात्र तरीही हे क्लिनिक बंद करावं लागलंय.