Omicron चा धोका : मुंबई महापालिकेने उचलले हे मोठे पाऊल

Omicron Coronavirus : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रोनचा संसर्ग वाढताना दिसत आहे.  

Updated: Dec 23, 2021, 02:58 PM IST
Omicron चा धोका : मुंबई महापालिकेने उचलले हे मोठे पाऊल title=

मुंबई : Omicron Coronavirus : देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रोनचा संसर्ग वाढताना दिसत आहे. 200च्यावरु रुग्णांचा आकडा गेला आहे. कोरोनाचा धोका असल्याने आता मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. मुंबई महापालिकेनं (Mumbai Municipal Corporation) आता गर्दीच्या ठिकाणी लसीकरण केंद्र उभारायला सुरुवात केली आहे.

घाटकोपर एन वार्डमध्ये मेट्रो स्थानकावर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. दोन आठवडे इथं लसीकरण सुरू राहील. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणि कामावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांना तातडीने लस घेणे शक्य व्हावे, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. 

तसेच ओमायक्रॉनचे तीन संशयित रुग्ण नांदेडमध्ये आढळले आहेत. हे तिघेही नांदेडमधल्या हिमायतनगरचे रहिवासी आहेत. दक्षिण अफ्रिकेतून ते तिघे आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ओमायक्रॉनचा संशय असल्यानं त्यांचे नमुने तापासाणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

दरम्यान, कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे धोका पत्करू शकत नाही. लसीकरण न झालेल्यांना लोकल प्रवास करण्याची आणि इतरांमध्ये मिसळण्याची मुभा दिल्यास सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल असे स्पष्टीकरण राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकल प्रवासासाठी लस सक्ती का, असा सवाल न्यायालयाने विचारला होता. 

दुसरीकडे राज्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरातले नगरसेवकच लसीकरणाबाबत उदासीन असल्याचं उघड झालंय. मालेगाव महापालिकेत एकंदर 89 नगरसेवक आहेत. त्यांपैकी अवघ्या 28 नगरसेवकांनीच कोरोनाचे दुसरा डोस घेतलाय. तब्बल पावणे दोन वर्षांनंतर महापालिकेची प्रत्यक्ष महासभा भरली. या सभेसाठी लसीकरणाचे दोन डोस बंधनकारक होते. त्यामुळे हे वास्तव समोर आले आहे.