NTPC Job: मुंबईत मिळतेय चांगल्या पगाराची सरकारी नोकरी; 'येथे' पाठवा अर्ज

NTPC Recruitment 2024: एनटीपीसीमध्ये असोशिएट पद भरले जाणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 6, 2024, 08:14 PM IST
NTPC Job: मुंबईत मिळतेय चांगल्या पगाराची सरकारी नोकरी; 'येथे' पाठवा अर्ज title=
एनटीपीसी भरती

NTPC Recruitment 2024: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी मिळावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. यासाठी चांगले शिक्षण घेतले जाते. दर्जेदार कोर्स केले जातात. नोकऱ्यांविषयी वेळेवर माहिती न पडल्याने अनेकदा इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येत नाही. तुमच्याही अशा अनेक संधी हुकल्या असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC लिमिटेड) मध्ये
नोकरीची संधी चालून आली आहे. येथे पदभरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा,अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

एनटीपीसीमध्ये असोशिएट पद भरले जाणार आहे. एनटीपीसी भरती 2024 च्या पदांशी संबंधित पात्रता असलेले कोणतेही उमेदवार अधिकृत वेबसाइट ntpc.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.  एनटीपीसीच्या असोशिएट भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असलेल्या उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काय आहे पात्रता?

असोशिएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने जीएम लेव्हल आणि त्या समकक्ष पदावर काम केलेले असावे. उमेदवाराकडे वैज्ञानिक अधिकारी, सहायक संचालक ग्रेड, डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी, भारत सरकारचे न्युक्लियर पॉवर जनरेशन, यासंबंधी कामाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा 

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 62 वर्षे असावी. त्यानंतरच तुम्ही एनटीपीसीच्या या पदांसाठी अर्ज करू शकता.

एनटीपीसी भरतीसाठी इतर माहिती

आवश्यक पात्रता आणि निकषांची पूर्तता करणारे उमेदवार एनटीपीसीच्या सहयोगी पदांसाठी अर्ज करु शकतात. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.  ऑनलाइन अर्जाची लिंक NTPC भर्ती 2024 च्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध आहे. तसेच बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.

एनटीपीसी भरती 2024 अंतर्गत जारी केलेल्या अधिकृत नोटिफिकेशनुसार निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती मुंबईत केली जाईल. 7 डिसेंबर 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी फारच कमी कालावधी आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची नोंद घ्या.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा