आता अनिल देशमुख यांनी पाठवले ईडीला पत्र

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh ) यांनीच ईडीला पत्र लिहिले आहे.  

Updated: Jun 29, 2021, 12:52 PM IST
आता अनिल देशमुख यांनी पाठवले ईडीला पत्र title=

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh ) यांनीच ईडीला पत्र लिहिले आहे. (Anil Deshmukh has sent a letter to ED) व्हीसीद्वारे जबाब घेण्याची देशमुख यांनी विनंती केली आहे. तसेच ईडीने कागदपत्रे दिल्यास आजच ईडीसमोर उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. अनिल देशमुख यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, अनिल देशमुख हजर राहणार का? की चौकशीसाठी आल्यावर त्यांना अटक तर होणार नाही, हे प्रश्न आहेत. दरम्यान, देशमुख अटक टाळण्यासाठी न्यायालयात जाऊ शकतात, अशी शक्यता आहे.

देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली होती. मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ईडीने त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होत. मात्र, आजही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशी गेलेले नाहीत. प्रत्यक्ष चौकशीऐवजी ऑनलाईन जबाब देण्याची देशमुखांची तयारी असल्याचे पत्र त्यांनी ईडीला पाठवले आहे. कोरोनामुळे त्यांनी ऑडिओ, व्हिज्युअल माध्यमातून आपला जबाब नोंदवावा, असे त्यांनी म्हटले आहे. 

देशमुख यांच्या पत्रात काय?

 - अनिल देशमुख आजही ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता कमी
- प्रत्यक्ष चौकशीऐवजी ऑनलाईन जबाब देण्याची देशमुखांची तयारी
- अनिल देशमुखांचं ईडीला पत्र
- अनिल देशमुखांचं पत्र 'झी 24 तास'च्या हाती
- प्रत्यक्ष हजर राहू शकत नाही - देशमुख
- व्हीसीद्वारे जबाब घेण्याची देशमुखांची विनंती
- देशमुखांचे वकील ईडीकडे कागदपत्रं मागणार
- कागदपत्रं दिल्यास देशमुख स्वत: येतील, चौकशी सहकार्य करतील... - वकील
- अजून कोर्टात जामीनासाठी गेलो नाही. देशमुख आज ईडी समोर जातील-वकील

ईडीला लिहिलेल्या या पत्रात देशमुख यांनी म्हटले आहे की, मी जवळपास 72 वर्षांचा आहे, उच्च रक्तदाब आणि हृदयासंदर्भातील समस्या आणि विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त आहे. 25 तपास करताना आणि जबाब नोंदवताना मी बरेच तास आपल्याशी संवाद साधला. म्हणूनच, आज स्वत: उपस्थित राहणे योग्य नाही आणि मी माझा अधिकृत प्रतिनिधी पाठवत आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. “मुंबईतील हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचे टार्गेट अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला दिले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रामध्ये केला होता. या पत्रानंतर झालेल्या उडालेल्या गदारोळानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सीबीआय आणि नंतर ईडीनं त्यांच्या घरांवर छापे टाकल्यामुळे टाकले होते.