शिवसेना-भाजपच्या नऊ माजी मंत्र्यांना शासकीय बंगले रिकामे करण्याची नोटीस

या माजी मंत्र्यांमध्ये भाजप आणि शिवसेनेसह रिपाईच्या मंत्र्यांचाही समावेश आहे

Updated: Jan 4, 2020, 01:32 PM IST
शिवसेना-भाजपच्या नऊ माजी मंत्र्यांना शासकीय बंगले रिकामे करण्याची नोटीस title=

दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारमधील माजी ९ मंत्र्यांना शासकीय बंगले रिक्त करण्याची नोटीस बजावण्यात आलीय. सार्वजनिक बांधकाम विभागानं ही नोटीस बजावलीय. या माजी मंत्र्यांमध्ये भाजप आणि शिवसेनेसह रिपाईच्या मंत्र्यांचाही समावेश आहे. 

या नऊ मंत्र्यांमध्ये पुढील मंत्र्यांचा समावेश आहे... 

- सुधीर मुनगंटीवार, भाजप, माजी अर्थमंत्री, नियोजन आणि वनमंत्री (देवगिरी, मलबार हिल)

- जयदत्त क्षिरसागर, शिवसेना, माजी जलसंधारणमंत्री (सातपुडा, मलबार हिल)

- रामदास कदम, शिवसेना, माजी पर्यावरण मंत्री (शिवगिरी, मलबार हिल)

- दीपक केसरकर, शिवसेना, माजी गृहराज्यमंत्री (अ-५, मादाम कामा मार्ग)

- मदन येरावार, भाजप, माजी ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषध मंत्री (अ-३, मादाम कामा मार्ग)

- अविनाश महातेकर, रिपाई, माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री (सुरुची - १५, चर्चगेट)

- सुभाष देशमुख, भाजप, माजी सहकारमंत्री (सुरुची - ३, चर्चगेट)

- सुरेश खाडे, भाजप, माजी सामाजिक न्यायमंत्री (अवंती - ८)

- अर्जुन खोतकर, शिवसेना, माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री (रॉकी हिल टॉवर १२०३, ना दा मार्ग, मलबार हिल)