...यापुढे महापौर बंगल्यात गणेश विसर्जन नाही!

महापौर प्रिंसिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर निवासात गणपती विसर्जनाचा पायंडा यंदा मोडण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Aug 26, 2017, 12:09 PM IST
...यापुढे महापौर बंगल्यात गणेश विसर्जन नाही! title=

मुंबई : महापौर प्रिंसिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर निवासात गणपती विसर्जनाचा पायंडा यंदा मोडण्याचा निर्णय घेतलाय. 

महापौर निवासात गणेश मूर्ती विसर्जनाची गेल्या दहा वर्षांची प्रथा बंद करण्यात आलीय. यंदा महापौर बंगल्यातील गणपतीच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

महापौर निवासाच्या शेजारी असलेल्या महापलिका क्रीडा संकुलात यंदा विसर्जनाची सोय करण्यात आलीय. माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी ही प्रथा सुरु केली होती. 'विसर्जनावेळी गर्दी होते' या कारणावेळी हा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर महाडेश्वर यांनी घेतलाय. 

मात्र, यामागे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला जागा देण्याच्या निर्णयामुळे यंदापासून महापौर निवासात गणेश विसर्जनाची प्रथा बंद करण्यात आल्याची चर्चाही सुरु आहे.