राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना 'नो एन्ट्री'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चक्क 'नो एन्ट्री' असणार आहे.

Updated: Nov 14, 2017, 05:00 PM IST
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना 'नो एन्ट्री' title=

दीपक भातुसे, प्रतिनिधी झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चक्क 'नो एन्ट्री' असणार आहे. २०१९ पर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कोणत्याही सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना न बोलवण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतलाय.

सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. तर कर्जमाफी, बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, बेरोजगारी तसंच विविध आघाड्यांवर सरकारला अपयश आल्यानं येत्या २५ नोव्हेंबरपासून सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी दिली. त्याशिवाय १ डिसेंबरपासून यवतमाळ ते नागपूर अशी पदयात्रा काढली जाणार असून, ११ डिसेंबरला ही पदयात्रा नागपूर अधिवेशनावर धडकणार आहे.