सरकार खुल्या बाजारात ५५ रुपये किलोने तुरडाळ विकणार

सर्वसामान्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. रोजच्या जेवणातून गायब झालेली तुरडाळ आता स्वस्त होणार आहे.

Updated: Nov 14, 2017, 03:37 PM IST
सरकार खुल्या बाजारात ५५ रुपये किलोने तुरडाळ विकणार title=

मुंबई : सर्वसामान्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. रोजच्या जेवणातून गायब झालेली तुरडाळ आता स्वस्त होणार आहे.

मागील हंगामात राज्य सरकारने खरेदी केलेली तुरडाळ आता रेशन दुकानांवर आणि खुल्या बाजारात ५५ रुपये किलो दराने विकण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार आहे.

राज्य सरकारने मागील हंगामात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली २५ लाख क्विंटल तुर सध्या पडून आहे. मात्र तुर खरेदी आणि विक्रीच्या या व्यवहारात राज्य सरकारला तब्बल ५०० कोटी रुपयांचा तोटा होण्याची चिन्हं आहेत.

दरम्यान, तुरडाळीचे भाव गेल्या काही महिन्याआधी गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातून डाळ गायब झाली होती. तुरडाळीच्या वाढलेल्या भावामुळे नागरिक हैराण झाले होते.