मुंबई : भायखळा जेलमध्ये महिला कैदी मंजूला शेट्ये मृत्यूप्रकरणी मुंबईच्या नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये जेलमधील सहा पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तसेच ज्या महिला कैद्यांनी जेलच्या छतावर चढून हंगामा केला त्यांच्यावरही दंगा करणे, मारहाण करणे असे गुन्हे दाखल करण्यात आलेत.
शुक्रवारी रात्री जेलमध्ये मंजूला शेट्ये नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी जेल प्रशासनाने रात्रभर दाबून ठेवली होती. मात्र सकाळी महिला कैद्यांनी हंगामा केल्यानंतर हि बातमी समोर आली आणि पोलिसांची धावपळ सुरू झाली. जेल प्रशासनानेही प्रसार माध्यमांना महिला कैद्याच्या मृत्यूची बातमी कळवली.
मात्र याबाबत जेल विभागाचे वरीष्ठ अधिकारी राजवर्धन यांना विचारलं असता त्यांनी याबाबत काहीही माहित नसल्याचं प्रसार माध्यमांना सांगितलं. त्यामुले राजवर्धन यांनी महिला कैदीच्या मृत्यूची बातमी लपवली का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.