मुंबई: राज्य सरकारने दारू घरपोच करण्याऐवजी शिवजयंतीच्या दिवशी ड्राय डे घोषित करावा, अशी मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात भाष्य केले आहे.
राज्य सरकारचा दारू घरपोच देण्याचा निर्णय चुकीचा आहे. सरकारने येणाऱ्या शिवजयंतीपासून म्हणजेच १९ फेब्रुवारीपासून राज्यात 'ड्राय डे' घोषित करावा, अशी मागणी त्यांनी केली.
मद्यप्राशन करुन वाहन चालवल्याने होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारने घरपोच दारुची सुविधा सुरु करण्याचा विचार सुरु होता. यासंदर्भातील वृत्त प्रकाशित होताच सरकारवर टीकेची झोड उठली होती.
अखेर मुख्यमंत्र्यांनी याबाबत सारवासारव करत सरकारचा असा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
घरपोच दारू नकोच..
येणाऱ्या शिव जयंती पासून १९ फेब " dry day” घोषीत करा..
शिव छत्रपतींचे आशीर्वाद नक्कीच भेटतील बावनकुळे साहेब!!— nitesh rane (@NiteshNRane) October 15, 2018