Nita Ambani And Bollwood Makeup Artist : आशियातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी यांचा घरी लगीन घाई आहे. त्यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट (Anant and Radhika Merchant) यांचा साखरपुडा थाट्यामाट्या पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातं आहे. सून राधिका मर्चंट हिचं स्मित हास्य आणि रुपाने नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे. मात्र सासू आणि आजी नीता अंबानी यांचा लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सासूच्या रुपासमोर नवीन नवरी राधिकाचंही सौंदर्य फिक ठरलं. नीता अंबानी यांच्या प्रत्येक सोहळ्यातील लूक हा चर्चेत असतो. सुंदर गुजराती पद्धतीची साडी, महागडे आणि आकर्षक दागिनी असं हे नीता अंबानी यांचं रुप पाहून सगळ्यांचा नजरा खिळल्या होत्या.
तुम्हीला आम्ही सांगितलं होतं की नीता अंबानी यांना साडी नेसविण्यासाठी डॉली जैन (Dolly Jain) ही महिला लाखो रुपये घेते. तसं नीता अंबानी यांना तयार करणारा मेकअप आर्टिस्ट कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? त्यांना कायम शाही लूकमध्ये तयार करणारा आर्टिस्टदेखील या कामासाठी लाखो रुपये घेतो. चला तर आज त्याचा बद्दल जाणून घेऊयात.
बॉलिवूडमधील नावजलेल्या अभिनेत्रीचं मेकअप करणारा आर्टिस्ट हा नीता अंबानी यांचंही मेकअप करतो. या आर्टिस्टचं नाव आहे मिकी कॉन्ट्रॅक्टर (mickey contractor) ...नीता अंबानी याचा सुंदर रुपामागे मिकी आणि डॉली जैन यांची मेहनत असते. मिकी हा नीता अंबानी यांचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट नाही तर तो ईशा अंबानी आणि सून श्लोका मेहताचंही रुप उजळवतो. अंबानी कुटुंबात कुठलाही सोहळा असो किंवा कार्यक्रम मिकीच हा सर्वांना मेकअप करतो. (nita ambani gives lakhs of rupees for makeup and Nita Ambani And Bollwood Personal makeup artist mickey contractor)
मिकी कॉन्ट्रॅक्टर यांनी बॉलिवूडमधील अभिनेत्री करीना कपूर, दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा अशा अनेकांना मेकअप केला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण ऐश्वर्या रायच्या लग्नातही तिचा मेकअप मिकी यांनी केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील इव्हेंटसाठी 75 हजार रुपये मानधन घेतो. तर मुंबई बाहेरचं काम असेल तर साधारण 1 लाखाच्या जवळ तर कधी कधी त्याहून अधिक मानधन घेतो. तुम्हाला माहिती आहे मिकीला मेकअप आर्टिस्ट होण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली ते...तर मिकीला सलमान खान यांची आई अभिनेत्री हेलन यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. मिकी हे हेलन यांचे हेअर ड्रेसर होते. त्याकाळात मिकी टोक्यो ब्यूटी पार्लरमध्ये हेअर ड्रेसर होते.
आज मिकी यांनी त्याचा कामातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव कमावलं आहे. त्यांना त्यांचा कामासाठी अनेक अवॉर्डदेखील जिंकल आहेत. कुछ कुछ होता है, डॉन, अंग्रेजी मीडियम, कल हो ना हो, माय नेम इज खान, वीरे दी वेडिंग, कार्तिक कॉलिंग कार्तिक, हम आपके है कौन, दिल तो पागल है या चित्रपटातील अभिनेत्रींना मिकी यांनीच मेकअप केला होता.