राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरु

Updated: Oct 12, 2018, 02:10 PM IST
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरु झाल्या आहेत. आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मुंबईत बैठक होत असतानाच आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात काय चर्चा झाली आणि या भेटीमागचं कारण काय याबाबत आता चर्चा सुरु आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी ही सदीच्छा भेट असल्याचं ट्विट केलं आहे.

लोकसभा निवडणुकीतील उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज मुंबईत होत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा बैठक होत आहे. या बैठकीत साधारणतः दहा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. यात काही विद्यमान खासदारांची नावं निश्चित केली जाणार आहेत. 

याशिवाय आज संध्याकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत बैठक होणार आहे. या बैठकीत कुठल्या जागांवर दावा सांगायचा याबाबत राष्टावादीच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.