मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते अजितदादा यांना सध्या करमत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अजित पवार हे सध्या सत्तेत आहेत, म्हणजे सत्तासुंदरीच्याजवळ आहेत, तरी देखील अजितदादा यांना करमत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्याला जुन्या साथीदारांची आठवण येत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. तुम्हाला त्यांचे जुने पहाटेच्या शपथविधीचे साथीदार देवेंद्र फडणवीसही वाटू शकतात, पण तसं अजिबात नाहीय.
अर्थातच जुने साथीदार म्हणजे जे पक्ष सोडून गेले आहेत, असे अजित पवार यांचे निकटवर्तीय. अजित पवार यांचे अनेक जवळचे कार्यकर्ते अजूनही विरोधी पक्षात, मुख्यत्वे भाजपात आहेत.
अजित पवार यांनी म्हटलंय की, त्यांना जुन्या साथीदारांशिवाय करमत नाही. सर्वांना मी आता कोरोना संपल्यानंतर मोठा कार्यक्रम घेऊन भेटणार आहे. आपण सर्वांनी पुन्हा एकदा मिळून काम करु या अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
अजित पवार हे जर त्यांचे जुने साथीदार जे भाजपात गेले आहेत, यांच्याविषयीच बोलत असतील तर भाजपाला देखील आता सावध राहण्याची गरज आहे. कारण मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीतून भाजपात इनकमिंग झालं होतं, आता हेच इनकमिंग आऊटगोईंगमध्ये बदललं तर राज्यातल्या भाजपा नेतृत्त्वालाही यावर विचार करावा लागेल.