राष्ट्रवादीचा आणखी एक नेता लवकरच तुरुंगात, भाजप नेत्याचं ट्विट

राष्ट्रवादीचा मोठा नेता हा लवकरच नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासोबत तुरुगांत असेल, असं आणि आणखी खळबळजनक ट्विट भाजप नेत्याने केलं आहे. 

Updated: Aug 16, 2022, 11:40 PM IST
राष्ट्रवादीचा आणखी एक नेता लवकरच तुरुंगात, भाजप नेत्याचं ट्विट title=

मुंबई :  राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप (Bhartiya Janta Party) नेत्याने खळबळजनक ट्विट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) आणखी एक मोठा नेता हा लवकरच नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासोबत तुरुगांत असेल, असं आणि अनेक खळबळजनक ट्विट भाजप नेत्याने केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. भाजप नेते मोहित कबोंज यांनी हे ट्विट केलं आहे. मलिक आणि देशमुख राष्ट्रवादीचे हे दोन्ही नेते मनी लॉंड्रिग प्रकरणात आर्थर रोड कारागृहात आहेत. (ncp big leaders will meet to nawab malik and anil deshmukh in jail bjp leader mohit kamboj bharatiya give hint via tweet series)

ट्विटमध्ये काय म्हटलंय? 

"राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार", अशा आशयाचं पहिलं खळबळजनक ट्विट कंबोज यांनी केलं. त्यामुळे कंबोज यांचा रोख नक्की कोणाकडे आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कंबोज यांनी पहिल्या ट्विटनंतर काही वेळातच दुसरं ट्विट केलं. 

दुसऱ्या ट्विटमध्ये काय म्हटलंय?

लवकरच पत्रकार परिषद घेऊन  राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल गौप्यस्फोट करणार, असल्याचं कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

तसेच देश परदेशात असलेली मालमत्तांची यादी, बेनामी कंपन्या, मैत्रिणीच्या नावे असलेली मालमत्ता, मंत्रिपदावर असताना केलेले घोटाळे, कुटुंबियांचं उत्पन्न आणि मालमत्ता यादी याबाबत सर्व गौप्यस्पोट पत्रकार परिषदेत करणार असल्याचं कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. 

कोण आहे मोहित कंबोज भारतीय ? (Who Is Mohit Kamboj Bharatiya)

मोहित कंबोज हे व्यावसायिक असून केबीजे कंपनीचे ते मालक आहेत. सप्टेंबर 2013 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच ते मुंबई भाजपचे माजी सचिव आणि माजी उपाध्यक्ष ही राहिले आहेत. भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष देखील होते.

2019 साली त्यांची मुंबई भाजपच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.

2014 साली ते दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी त्यांचा पराभव केला होता.