मुंबई : कंगना रानौतच्या कार्यालयाचा काही भाग अनधिकृत असल्याची नोटीस महानगरपालिकेकडून देण्यात आली होती. यावर उत्तर न दिल्यास कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला होता. कंगनाने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या घटनेवर सर्वच स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. आता खासदार नवनीत कौर राणा यांनी ट्विट करून 'ही हुकुमशाही चांगली नाही' म्हटलं आहे.
'राज्य सरकार कंगनाचं ऑफिस तोडत आहेत. सत्तेच्या मोहात ताकदीचा असा गैरवापर केला जातोय. BMC शिवसेनेकडे आहे. ही हुकूमशाही चांगली नाही,' असं ट्विट नवनीत कौर राणा यांनी केलं आहे.
राज्य सरकार कंगना का ऑफिस तोड रहे है, सत्ता के मोह मे ताकत का दुरुपयोग कर रहे है, BMC शिव सेना के पास है, ये हुकूमशाही अच्छी नही है। @narendramodi @AmitShah @ombirlakota @Dev_Fadnavis @abpmajhatv @TV9Marathi @News18lokmat
— Navneet Kaur Rana (@navneetravirana) September 9, 2020
कंगनाच्या या प्रकरणावर राजकीय वर्तुळात राजकारण सुरू आहे. 'सूडबुद्धीने पालिकेने केलेल्या कारवाईचा निषेध करतो. अशा बांधकामांवर कारवाई करण्याआधी सर्व प्रक्रियांना बगल देत ही कारवाई पालिकेने केली आहे. तेव्हा अनधिकृत बांधकामांबद्दल जेवढ्या तक्रारी आलेल्या आहेत त्यांवर 24 तासाच्या आता कारवाई करावी', अशी प्रतिक्रिया भाजच्या आशिष शेलारांनी दिली आहे.
शिवसेनेने कंगनाच्या प्रकरणावर मौन पाळले आहे. या विषयावर कुणीच बोलू नका, मातोश्रीचे पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना सक्त आदेश देण्यात आले आहेत. कंगनाच्या कार्यालयाच्या पाडकामावर न बोलण्याचा पक्षादेश देण्यात आले आहे. मुंबई मनपाची कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप भाजपने केले आहे. या कंगना प्रकरणावर शिवसेनेने मौन पाळले आहे.