शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थिनीचा हात फॅक्चर

सतत वादग्रस्त राहीलेली नवीन पनवेल सेक्टर ७ मधील रायन इंटरनॅशनल ग्रुपची सेंट जोसेफ शाळा आपल्या मनमानी कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शाळेतल्या एका महिला शिक्षिकेनं क्षुल्लक कारणावरून इयत्ता 5 वीच्या वर्गात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना मारहाण केली.

Updated: Nov 12, 2017, 11:18 PM IST
शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थिनीचा हात फॅक्चर title=

मुंबई : सतत वादग्रस्त राहीलेली नवीन पनवेल सेक्टर ७ मधील रायन इंटरनॅशनल ग्रुपची सेंट जोसेफ शाळा आपल्या मनमानी कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शाळेतल्या एका महिला शिक्षिकेनं क्षुल्लक कारणावरून इयत्ता 5 वीच्या वर्गात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना मारहाण केली.

अंजली चव्हाण असं या महिला शिक्षिकेचे नाव आहे. विद्यार्थ्यांनी वही आणली नाही म्हणून या महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यांना लाकडी पट्टी आणि डस्टरने हातावर मारहाण केली. या मारहाणीत एका विद्यार्थिनीचा हात फॅक्चर झाला आहे. तर दोन विद्यार्थ्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पालकांनी शाळा प्रशासनाकडे जाब विचारला असता शाळा प्रशासनाकडून अरेरावीची भाषा करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास खांदेश्वर पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केली.