मुंबईच्या विक्रोळीत 7/11 च्या स्फोटातल्या आरोपीच्या घरी NIAचा छापा, घराबाहेर पोलीस आणि आरोपीच्या वकिलांत वाद

महाराष्टासह देशभरात वेगेवगळ्या ठिकाणी एनआएने छापेमारी केली आहे. मुंबतल्या विक्रोळीतही एनआयएने छापे टाकले. मुंबई 7/11 स्फोटातला आरोपी विक्रोळी भागात राहातो. यावेळी शेख याच्या घराबाहेर पोलीस आणि आरोपीच्या वकिलात वादावादीही झाली.

राजीव कासले | Updated: Oct 11, 2023, 01:38 PM IST
मुंबईच्या विक्रोळीत 7/11 च्या स्फोटातल्या आरोपीच्या घरी NIAचा छापा, घराबाहेर पोलीस आणि आरोपीच्या वकिलांत वाद title=

NIA Raid : देशभरात विविध ठिकाणी NIA ने छापेमारी केलीय.. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानमध्ये ही कारवाई सुरु आहे.. मुंबईच्या विक्रोळीतही एनआयने धाड टाकलीय.. मुंबईत 11 जुलै 2006 ला ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटातला (7/11 Railway Bomb Blast) आरोपी वाहिद शेखच्या विक्रोळीतल्या घरी ही धाड टाकण्यात आलीय. यावेळी वाहिद शेखच्या घराबाहेर पोलीस आणि आरोपीच्या वकिलात वाद झाला.

सहा तासानंतर घरात एन्ट्री
तब्बल सहा तासानंतर  NIAची टीम वाहिद शेख याचा घरात शिरली. यादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहिद शेख याच्या वकिला सोबत पोलिसांची बाचाबाची देखील झाली. त्यानंतर एनआयएची टीम अखेर वाहिद शेख यांच्या घरात शिरली. सध्या वाहिद शेख याची चौकशी त्याच्या घरात सुरू आहे.

पीएफआय संघटना प्रकरणात एनआयए देशभरात ठिकठिकाणी छापेमारी करत आहे. विक्रोळी पार्क साईट इथे वाहिद शेख याच्या घरी एनआयएचं पथक पहाटे पोहचलं. मात्र वाहिद शेख दरवाजाच उघडला नाही. जो पर्यंत नोटीस दाखवत नाही तो पर्यंत दरवाजा उघडनार नाही असा पवित्रा वाहित शेखने घेतला. त्यामुळे एनआयएचं पथक आणि पोलीस त्यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसले.

अब्दुल वाहिद शेख रेल्वे बॉम्ब स्फोट प्रकरणी अटकेत होता. मात्र त्याची 2015 मध्ये निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर तो शिक्षक म्हणून काम करतोय. त्याने वकिलीचे शिक्षण घेतलं आहे. त्याच्या कुटुंबात पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत. 

वाहिदचे वकील इब्राहम हार्बट यांनी पोलिसांशी वाद घातला. कागदपत्रे नसल्याचे त्यानी सांगिलं. त्यामुळे आता एनआयए आणि पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.