Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम पाहा

PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज गुरुवारी मुंबईत येणार आहेत. मोदी यांचे सायंकाळी 4.14 वाजता मुंबईत आगमन होणार आहे. त्यांच्या दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर झाला आहे. (Mumbai News in Marathi)

Updated: Jan 19, 2023, 03:10 PM IST
Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम पाहा title=
PM Narendra Modi Mumbai Visit

PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज गुरुवारी मुंबईत येणार आहेत. (Narendra Modi Visit Mumbai) मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (MMRDA) आणि अन्य काही संस्थांच्या नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मोदी यांचे सायंकाळी 4.14 वाजता मुंबईत आगमन होणार आहे. त्यांच्या दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर झाला आहे. (Mumbai News in Marathi)

PM Narendra Modi Visit Mumbai LIVE : पंतप्रधान मोदी मुंबईत, कसा असणार त्यांचा दौरा?

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासाठीच्या नियोजनासाठी मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र महानगरपालिकेच्या प्रकल्पांचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तर दुसरीकडे मोदींच्या दौऱ्यासाठी 250 हून अधिक एसटी बसेसचं बुकिंग करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातून एसटी बसेस सुटणारेय. सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिलीय. दसरा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा एसटी बसचं मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आले आहे.

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी हे मुंबईत एक रोड शो सुद्धा करणार आहेत. मोदी  यांचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून कंबर कसली आहे. नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत दौऱ्यात मुंबई पोलिसांच्या 900 अधिकाऱ्यांसह साडेचार हजार पोलिसांचा (Mumbai Police) फौजफाटा तैनात असणार आहे. संपूर्ण परिसरात पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान ड्रोन, पराग्लाइडर्स तसेच रिमोट कंट्रोल लाईट एअरक्राफ्ट उडवण्यास मनाई करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांचा मुंबई दौरा कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन 4 वाजून 14 मिनिटांनी आगमन 

4.15 वाजता मुंबईतील बीकेसी ग्राउंड कडे रवाना 

5.05 वाजता बीकेसी कार्यक्रमस्थळी आगमन 

5.05 ते 5.10 वाजता स्वागत

5.10 ते 5.28 वाजता विकास कामाचं उदघाटन चित्रफीत लावली जाईल 

5.28 ते 5.38 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे भाषण 

5.38 ते 5.48 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण

5.48 ते 6.18 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

6.19 वाजता पंतप्रधान मेट्रो उदघाटनाकडे रवाना 

6.30 वाजता गुंदवली स्टेशन आगमन 

6.34 वाजता मेट्रोचे उदघाटन 

6.38 वाजता मोदी मेट्रोची तिकीट काढणार 

6.40 वाजता मेट्रो अ‍ॅपच उदघाटन 

6.53 वाजता  गुंदवली स्टेशनवरुन मेट्रोतून प्रवास 

7 वाजता विमानतळाकडे रवाना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम

दुपारी 4.40 वाजता :  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आगमनप्रसंगी उपस्थिती, मुंबई विमानतळ
सायंकाळी 5 वाजता : मुंबईतील विविध प्रकल्पांचे लोकार्पण/भूमिपूजन/लाभ वितरण व सभा, बीकेसी, मुंबई
सायंकाळी 6.30 वाजता: मुंबई मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण, गुंदवली मेट्रो स्टेशन, अंधेरी, मुंबई
सायंकाळी 7.20 वाजता:  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रयाणप्रसंगी उपस्थिती, मुंबई विमानतळ