नारायण राणे यांचा भाजप-शिवसेनेला जोरदार चिमटा

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला आहे. राणे यांनी निवडणुकीच्या विजयानंतर अशी प्रतिक्रिया दिली.

Updated: Apr 12, 2018, 02:33 PM IST
नारायण राणे यांचा भाजप-शिवसेनेला जोरदार चिमटा title=

मुंबई : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला आहे. दहा जागांवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा विजय झालाय. शिवसेनेचे नाक कापल्याची तिखट प्रतिक्रिया राणे यांनी दिली आहे. कोकणात जिथे स्वाभिमान तिथे यश असेल. कोकणात विकास पाहायचा असेल तर स्वाभिमान शिवाय गत्यांतर नसेल. मुख्यत्वे नितेश राणे यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे अक्षरश: शिवसेना आणि तिथले त्यांचे साथीदार भाजपचे नाक कापलं गेलेय, अशी पहिली प्रतिक्रिया नारायण राणे यांनी कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या विजयानंतर दिली.

पाहा राणे  काय म्हणालेत?

- कोकणात जिथे स्वाभिमान तिथे यश असेल. कोकणात विकास पाहायचा असेल तर स्वाभिमानाशिवाय गत्यंत्तर नसेल. 

 - मुख्यमंत्र्यानी प्रकट मुलाखतीत म्हटले होते की बाळासाहेबांच्या शिवसेनेला युतीशिवाय पर्याय नाही!, असा प्रश्न विचारला असताना राणे म्हणालेत, बाळासाहेबांची शिवसेना राहिलीय कुठे ? ही उद्धवची शिवसेना आहे .

- दरम्यान, भाजपच्या उपोषणावर राणे यांनी जास्त भाष्य करणे टाळले. मी आज दौऱ्यावर आहे. उपोषण आंदोलनाबाबत सविस्तर माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. त्यामुळे मी सहभागी झालेलो नाही. पण भाजपनं, पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय आहे तो रास्त आहे. त्यामुळे माझं उपोषण आंदोलनाला समर्थन आहे, असे राणे म्हणालेत. 

- मुख्यत्वे नितेश राणे यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे अक्षरश: शिवसेना आणि तिथले त्यांचे साथीदार भाजपचं नाक कापलं गेलंय, असे सांगत मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर सूचक व्यक्तव्य केले. मुख्यमंत्री यांनी म्हटलं होतं की शिवसेना सवतीप्रमाणे वागते म्हणून आम्हाला नारायण राणे यांना भाजपमध्ये घ्यावं लागलं, या प्रश्नावर राणेंनी उत्तर देणे टाळलं. मला भाष्य करायचे नाही.