आधी बाळासाहेबांचं स्मारक पूर्ण करा, नंतर राम मंदिरबाबत बोला - राणे

अयोध्येत राम मंदिर उभारण्यावरुन राजकारण सुरु झालेय.  

Updated: Oct 19, 2018, 07:23 PM IST
आधी बाळासाहेबांचं स्मारक पूर्ण करा, नंतर राम मंदिरबाबत बोला - राणे title=

मुंबई : अयोध्येत राम मंदिर उभारण्यावरुन राजकारण सुरु झालेय. भाजपने सत्तेत आल्यास राम मंदिर उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, राम मंदिरबाबत बोलायला भाजप तयार नाही. यावरुन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप टीका केली. तुम्ही मंदिर बांधताय का, की आम्ही बांधू, असे उद्गार काढले. यावरुन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांनी टोला लगावलाय.

राम मंदिरापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक पूर्ण करा, राणेंनी टोला हाणला. राम मंदिराच्या मुद्यावरून नारायण राणे यांनी मोहन भागवत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी राममंदिराचा मुद्दा काढल्याची टीका राणेंनी केलीय. आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा मग राममंदिराचं बघा असा टोलाही राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. तर मोहन भागवत यांनी उद्गार चिन्हात बोलण्यापेक्षा राममंदिर उभारण्याचा आदेश द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.