Sharad Pawar | मुंबईतील 'या' मोठ्या संस्थेच्या संग्रहालयाला शरद पवार यांचं नाव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawawr) यांचं मुंबईतील (Mumbai) एका मोठ्या संस्थेच्या संग्रहालयाला नाव देण्यात येणार आहे. 

Updated: Feb 11, 2022, 10:15 PM IST
Sharad Pawar | मुंबईतील 'या' मोठ्या संस्थेच्या संग्रहालयाला शरद पवार यांचं नाव title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) संग्रहालयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव देण्यात येणार आहे. एमसीएची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला आहे. (museum to be held at mumbai cricket association wankhede stadium will be named after former mca president sharad pawar)

एमसीए अध्यक्ष विजय पाटील यांनी बैठकीत शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि या प्रस्तावाला प्रमुख परिषद सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला. वानखेडे स्टेडियममध्ये हे संग्रहालय असणार आहे. 

शरद पवारांचं  यांचं नाव संग्रहालयाला देणे ही एमसीएसाठी अभिमानास्पद बाब आहे. पवारांनी मुंबई क्रिकेटची प्रतिष्ठा देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखीन वाढवली होती. क्रिकेटबद्दलचे त्यांचे योगदान हे प्रत्येक क्रिकेटपटूला माहिती आहे. 

शरद पवारांनी विविध पेन्शन योजना  सुरू केल्या. तसेच गरजू मुलांना शिष्यवृत्तीही दिली होती. त्यामुळे शरद पवार यांचे नाव संग्रहालयाला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

शरद पवार यांचे क्रिकेटमधील योगदान 

शरद पवारांनी 2001 ते 2013 या 12 वर्षांच्या  कालावधीत एमसीएची (MCA) धुरा सांभाळली होती. यादरम्यान ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) देखील अध्यक्ष होते.