मुंबईतील फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंटला जलसमाधी

वांद्रे वरळी सी लिंकजवळचं आर्क डेक बार हे हॉटेल 

मुंबई : वांद्रे वरळी सी लिंकजवळचं आर्क डेक बार हे हॉटेल बुडण्याच्या स्थितीत आहे. ७० टक्क्यांहून जास्त हे हॉटेल बुडाल आहे. हे जहाज बुडणार याचा अंदाज होता  त्यामुळे आधीपासूनच हे हॉटेल रिकामं करण्यात आलं होतं. यावेळी पंधरा लोकं या जहाजावर होते.. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.  मुंबईतील समुद्रात फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंटला जलसमाधी मिळाली. सुदैवाने क्रूझवरील कामगारांना वेळीच बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंक जवळ एआरके डेक बार हे फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंट होतं. शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास जोरदार लाटांमुळे समुद्राचं पाणी क्रूझच्या आत शिरलं. त्यामुळे क्रूझ भरसमुद्रात बुडाली. क्रूझ रेस्टॉरंटमध्ये असलेल्या कामगारांची सुदैवाने वेळीच सुटका करण्यात आली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र नजीकच्या काळात अशा दुर्दैवी अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा बाळगळण्याची गरज व्यक्त होत आहे.