Mumbai Water Cut News: मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणी जपून वापरण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील बीएमसीने 24 एप्रिल 2024 पर्यंत संपूर्ण शहरात 5 टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केलं जातंय. भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व संवर्धनाच्या कामामुळे ही पाणीकपात करण्यात आली आहे, असं बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय.
शहरातील भांडुप उपनगरात आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण केंद्र आहे. हे जलशुद्धीकरण केंद्र महानगराच्या बहुतांश भागांना पाणीपुरवठा करतं. भांडुप संकुलात 1,910 दशलक्ष लिटर आणि 900 दशलक्ष लिटर क्षमतेची दोन जलशुद्धीकरण युनिट आहेत.
बीएमसीच्या म्हणण्यानुसार, दररोज 900 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प दररोज सुमारे 990 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. अशातच BMC सध्या प्लांटमधील टाक्या स्वच्छ करण्याच्या उद्देशाने मान्सूनपूर्व देखभाल मोहिमेत व्यस्त आहे. दरम्यान यापूर्वी बीएमसीने संपूर्ण शहरातील पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्याची घोषणा केली होती.
त्यावेळी, वैतरणा आणि भातसा धरणांच्या साठ्यातून पाणी सोडण्याबाबत राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर ही कपात न करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांची पाणीपातळी 50 टक्क्यांच्या खाली गेल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फिल्टरेशन प्लांटच्या मोठ्या टाक्या पावसाळ्यापूर्वी स्वच्छ कराव्या लागतील आणि या कामाला सुमारे एक महिना लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, सात तलावांमध्ये 37% इतका साठा आहे, जो गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी आहे. राज्य सरकारने अप्पर वैतरणा आणि भातसा इथल्या 15% पर्यंत अतिरिक्त साठा वापरण्याची परवानगी बीएमसीला दिली आहे.
BMC शहराला दररोज 3,900 दशलक्ष लिटर पाणी पुरवते. यावेळी हे भांडुप कॉम्प्लेक्स आणि पिसे इथल्या फिल्टरेशन प्लांटमध्ये शुद्ध करण्यात येतं. 2,810 MLD क्षमतेचा हा आशियातील सर्वात मोठा ट्रीटमेंट प्लांट आहे. भांडुपमध्ये अंदाजे 1,910 MLD आणि 900 MLD फिल्टर करण्याची क्षमता असलेली दोन युनिट्स आहेत.