मुंबई : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर ऑफिस निघालेल्या मुंबईकरांना आज सकाळी पावसानं गाठलं. सुटीच्या दिवशी आनंद देणारा पाऊस आज मात्र सर्वांनाचा नकोसा वाटत होता. काही सखल भागात पाणी साचले आहे. सकाळ पासूनच पूर्व उपनागरात पावसाने जोर धरला आला तरी वाहतुकीवर मोठा परिणाम दिसत नाही.
मुंबई उपनगरात पावासाचा जोर अजूनही कायम आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे. मुलुंड भांडुप भागात साचचेल्या पाण्यामुळे एस रोड प्रभावित झाला आहे. मुंबईत रात्रभर पाऊस पडल्यानंतर सकाळी पावसानं उसंत घेतली असून आता मुंबई पूर्वपदावर येत आहे. पावसामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक सुरळीत होत असून सखल भागातील पाण्याचाही निचरा होत आहे.
आज दुपारी २ वाजून ३९ मिनिटांनी समुद्राला उधाण येणार आहे. आताच समुद्र खवळलेला दिसतोय. 4.8 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. ओसरलेला पाऊस परतल्या शहरात पाणी घुसण्याची शक्यता आहे.