Valentine's Day चं Gift पडलं महागात, महिलेने गमावले 3.68 लाख, वाचा नेमकं प्रकरण काय?

Valentine's Day Gift: मुंबईतील एका महिलेला व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने लाखोंचा गंडा घालण्यात (Valentine's Day Crime News) आल्याची घटना घडली आहे. झालं असं की...

Updated: Feb 14, 2023, 02:49 PM IST
Valentine's Day चं Gift पडलं महागात, महिलेने गमावले 3.68 लाख, वाचा नेमकं प्रकरण काय? title=
valentine's day gift

Valentine's Day Crime News: आज संपूर्ण जगभरात व्हॅलेन्टाईन डे (Valentine's Day) साजरा केला जातोय. अनेकजण आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली देतात. खासकरून युवा वर्गात व्हॅलेन्टाईन वीकची मोठी क्रेझ असते. तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी खर्च करताना मागेपुढे पाहिलं जात नाही. मग काय होऊ दे खर्च... मोठमोठ्या किंमतीचे गिफ्ट (Valentine's Day Gift) देखील स्पेशल वाटतात. आजच्या दिवसासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून अनेक ऑर्डर येत असतात. मात्र, ऑनलाईन खरेदीमध्ये (Online shopping Fraud) फ्रॉड होण्याचे धोके देखील असतात. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. 

मुंबईतील एका महिलेला व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने लाखोंचा गंडा घालण्यात (Valentine's Day Crime News) आल्याची घटना घडली आहे. व्हॅलेंटाईन डे गिफ्ट पाठवण्याच्या बहाण्याने महिलेला 3.68 लाख रुपये गमवावे लागले आहेत. मुंबईतील खार (Mumbai Crime News) भागातील हे प्रकरण असल्याची माहिती मिळाली आहे. महिलेची काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर अॅलेक्स लोरेन्झो (Alex Lorenzo) नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. त्यानंतर त्याने महिलेला सांगितलं की त्याने तिला व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने गिफ्ट पाठवलंय. महिलेला आनंद झाला. तिने देखील गिफ्ट कबुल केलं. गिफ्ट मिळवण्यासाठी महिलेला 750 युरो शुल्क भरावे लागेल, असं त्याने तिला सांगितलं. भेटवस्तूच्या लालसेपोटी महिलेने ही फीही भरली.

चार वेळा आला फोन-

आता गिफ्ट मिळणार म्हणून महिलेचा आनंद गगनात मावेना. त्यानंतर महिलेला कुरियर कंपनीचा (Courier company) मॅसेज आला. पार्सलची लिमिट जास्त असल्याने अधिकचे 72 हजार द्यावे लागतील, असं तिला सांगण्यात आलं. त्यावेळी महिलेने ते पैसे देखील भरले. त्यानंतर कुरियर कंपनीतील महिलेने पुन्हा फोन केला आणि सांगितलं की, यावेळी तिला पार्सलमध्ये युरोपियन चलन (Euro) मिळाल्याचे सांगण्यात आलं. हे प्रकरण मनी लाँड्रिंगचं आहे. मनी लाँड्रिंग (Money laundering) शुल्क टाळण्यासाठी त्याला आणखी 2,65,000 रुपये द्यावे लागतील, असं सांगण्यात आलं. महिलेने भीतीपोटी ही रक्कम देखील भरली. मात्र...

आणखी वाचा - Valentine day 2023: दहा वर्षांची दोस्ती अन् जडलं प्रेम, अशी आहे 'राज'पुत्राची Love Story!

दरम्यान, चौथ्यांदा महिलेला पैसे मागण्यात आले त्यावेळी महिलेला संशय आला. महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी महिलेला धमकी देण्यात आली. सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यात येतील, अशी धमकी मिळाल्यानंतर महिलेने थेट पोलीस स्टेशन (Police Station) गाठलं. पोलिसांनी या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली आणि तपास सुरू केला आहे. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी गर्लफ्रेंडसाठी ऑनलाईन खरेदी (Online shopping Fraud) करणार असाल तर योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.