Sinet Election Result: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये राखीव गटाच्या पाचही जागांवर आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. 22 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार होती. पण याला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. कोर्टाच्या आदेशानंतर 24 सप्टेंबर रोजी निवडणूक पार पडली ज्याचा निकाल समोर आला आहे. इतर मागासवर्गीयमध्ये मयूर पांचाळ, महिला प्रवर्गातून स्नेहा निलेश गवळी, अनुसूचित जाती प्रवर्गातून शितल शेठ, अनुसुचित जमाती प्रवर्गातून डॉ. धनराज कोहचाडे, व्हीजेएनटी प्रवर्गातून शशिकांत झोरे यांचा विजय झाला आहे.
मतदार नोंदणी झाल्यानंतर ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. यानंतर 22 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार होती. यालादेखील स्थगिती देण्यात आली होती. अखरे आज 24 सप्टेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 28(2)(न) नुसार अधिसभेवर 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता मतदान पार पडले. यात सुमारे 55 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. 28 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते.
मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीत युवासेनेचे खुल्या गटातील उमेदवार प्रदीप बाळकृष्ण सावंत हे पहिल्या पसंतीचे 1338 हून अधिक मते घेऊन सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत.
राखीव मतदारसंघाचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. डीटीएनटी प्रवर्गातून शशिकांत झोरे यांना 5170 तर अजिंक्य जाधव यांना 1066 मते मिळाली.
एससी प्रवर्गातून शीतल देवरूखकर यांना 5498 तर राजेंद्र सयगावकर यांना 1014 मते मिळाली.
एसटी प्रवर्गातून धनराज कोहचाडे यांना 5247 तर निशा सावरा यांना 924 मते मिळाली.
ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ 5350 तर राजेश भुजबळ यांना 888 मते मिळाली.
महिला प्रवर्गातून स्नेहा गवळी यांना 5014 तर रेणुका ठाकूर यांना 883 मते मिळाली.
या निवडणुकीसाठी 10 जागांसाठी एकूण 28 उमेदवार उभे होते. मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्रावर आणि 64 बुथवर ही निवडणूक पार पडली. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने या निवडणूकीसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली होती. 38 केंद्र आणि 64 बुथसाठी आवश्यक कर्मचारी आणि निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. आहे.
मुंबई सिनेट निवडणुकीच्या स्थगिती संदर्भातील याचिका महाराष्ट्र स्टुडंट युनियनने मागे घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होती. एकीकडे मतदान होत असताना आपण स्थगितीची मागणी करत आहात या संदर्भात कोर्टाने विचारला असता आपण ही याचिका मागे घेत असल्याचं महाराष्ट्र स्टुडंट युनियन कडून सांगण्यात आलंय. या प्रकरणात कुठलाही हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिला. निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असताना आणि मतदान होत असताना अशा प्रकारे याचिका करण्यात कुठलाही आधार नसल्याचं कोर्टाने म्हटलंय.