मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

Mumbai University Pre Admission :  मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया 25 मे पासून सुरू करण्यात येत आहे.

Pravin Dabholkar | Updated: May 24, 2024, 09:13 PM IST
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर title=
Mumbai University Admission

Mumbai University Pre Admission : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी पदवीच्या 3 आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया 25 मे पासून सुरू करण्यात येत असून या नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व महाराष्ट्र शासनाच्या 20 एप्रिल2023च्या शासन निर्णयानुसार 2 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च,  पाच वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी https://muadmissionug.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर जाऊन करता येणार आहे.  हे संकेतस्थळ आज दिनांक 25 मे  संध्याकाळी 5 नंतर उपलब्ध होणार आहे.

पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष2024-25 साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बीए.एमएमसी, बी.एसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलेव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन),  बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम ( फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम ( मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी ( बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी ( मेरिटाईम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी ( एरॉनॉटिक्स), बीएस्सी ( डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बी.व्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय.बीएस्सी ( बायोएनॅलिटिकल सायन्स- पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) यासह अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक :

अर्ज विक्री (संबधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाईन/ऑफलाईन) – 25 मे ते 10 जून (दुपारी 1 वाजेपर्यंत)

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – 25 मे ते 10 जून

ऑनलाईन एडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख – 25 मे ते 10 जून, (1 वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश  या कालावधीत करता येईल.

 पहिली मेरीट लिस्ट – 13 जून ( संध्याकाळी 5 वाजता)

ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – 14 जून ते 20 जून,  (दुपारी ३.०० वाजेपर्यंत )

द्वितीय मेरीट लिस्ट – 21 जून (संध्याकाळी 5 वाजता)

ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे  – 22 जून ते 27 जून ( दुपारी 3 वाजे पर्यंत)

तृतीय मेरीट लिस्ट -  28 जून  ( संध्याकाळी 5 वाजता)

ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे  –29 जून ते 3 जुलै  (दुपारी 3 वाजेपर्यंत)

कमेंसमेंट ऑफ क्लासेस/ ओरिएंटेशन-4 जुलै २०२४

पदवीच्या प्रथम वर्षासाठी होणारे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या तरतूदी आणि मार्गदर्शक तत्वानुसार होतील. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमीत केलेल्या या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी. तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले आहे.

एआयसीटी अंतर्गत बीएमएस अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनाच्या सीईटी सेलने पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर राबवली जाणार आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीसाठीचे संकेतस्थळ  https://muadmissionug.samarth.edu.in/ हे असून, हे  संकेतस्थळ25 मे रोजी संध्याकाळी5 वाजेनंतर उपलब्ध होणार आहे.