भांडूपमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू

सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील अनेक भागात हजेरी लावली. त्याच प्रमाणे मुंबई उपनगर आणि ठाणे पट्ट्यातही जोरदार पाऊस बरसला. 

Updated: Jun 3, 2018, 01:38 PM IST
भांडूपमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू title=

मुंबई : सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील अनेक भागात हजेरी लावली. त्याच प्रमाणे मुंबई उपनगर आणि ठाणे पट्ट्यातही जोरदार पाऊस बरसला. 

भांडूपमध्ये तिघांचा मृत्यू

मुंबईतल्या भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात विजेचा शॉक लागून तीन जणांचा मृत्यू झालाय. ९ वर्षांची मुलीसह एका व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. पावसामुळे जमीन ओली झाली होती. त्यामुळे शॉक लागून ही दुर्घटना घडली. त्यावेळी तिला वाचविण्यासाठी गेलेल्या अनिल यादव या तरुणाला देखील विजेचा शॉक लागून आपला जीव गमवावा लागला.