नशेसाठी वापरला जाणारा औषधांचा साठा जप्त

नशा करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणारा कफ सिरप आणि गोळ्यांचा साठा मानखुर्द पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदतीने सापळा रचून जप्त केला.

Updated: Sep 12, 2017, 12:40 PM IST
नशेसाठी वापरला जाणारा औषधांचा साठा जप्त title=

मुंबई : नशा करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणारा कफ सिरप आणि पेन किलर म्हणून वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचा साठा मानखुर्द पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदतीने सापळा रचून जप्त केला.

या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मानखुर्द पोलिसांना आपल्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर आरोपी बच्छराम प्रजापती हा नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे कफ सिरप तसेच गोळ्या आणत होता. पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला अटक केली.

यात प्रत्येकी १०० मीलीलिटर रेक्सस कंपनीच्या बाराशे बाटल्या आणि अल्को आणि नायट्रेटच्या १६ हजार ४७० गोळ्या आढळून आल्यात. याची किंमत २ लाखांच्या जवळपास आहे.

नशेच्या आहारी गेलेल्यांना हेच औषध पाहिजे असतं. यामागे एखादी टोळी आहे का? याचा तपास आता मानखुर्द पोलीस करत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.