संक्रमण शिबिरांसाठी जमीन मिळावी, राज्यसरकारची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

मुंबई पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) ने १०० एकर जमिनी लिजवर उपलब्ध करुन दिल्यास दक्षिण मुंबईतच संक्रमण शिबीरे बांधणे शक्य आहे. शिवाय येथील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्गही मोकळा होणार असल्याने, ही जमिनी मिळविण्यासाठी गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेणार आहेत. 

Updated: Sep 12, 2017, 01:09 PM IST
संक्रमण शिबिरांसाठी जमीन मिळावी, राज्यसरकारची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी title=

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) ने १०० एकर जमिनी लिजवर उपलब्ध करुन दिल्यास दक्षिण मुंबईतच संक्रमण शिबीरे बांधणे शक्य आहे. शिवाय येथील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्गही मोकळा होणार असल्याने, ही जमिनी मिळविण्यासाठी गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेणार आहेत. 

या संदर्भात भेटीची वेळ मिळावी यासाठी त्यांनी गडकरी यांना पत्रही पाठविले आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनीही पुढाकारा घ्यावा, अशी विनंती वायकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. 

वायकर यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

दक्षिण मुंबई येथील हुसैनी इमारत दुर्घटनाग्रस्त होऊन ३३ जणांना जीव गमवाला लागला होता. मुंबई शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्‍न ऐरणीवर असल्याने सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकार्‍यांबरोबर वायकर यांनी तातडीने बैठक घेतली. या विभागाच्या इमारतींचा म्हाडाने केलेल्या सर्व्हेमध्ये एकूण ९ इमारती अत्यंत धोकादायक असून त्यापैंकी २ इमारतींना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याची माहिती अधिकार्‍यांनी राज्यमंत्री यांना दिली. त्याचबरोबर सद्यस्थितीत १४३७५ इमारती धोकादायक आहेत, उपकरप्राप्त १९००० इमारती पैकी, १४२८६ इमारती दुरुस्तीसाठी/ पुनर्विकासासाठी प्रलंबित असल्याचेही त्यांनी राज्यमंत्री यांना सांगितले. 

धोकादायक इमारतींचा कालबद्ध पद्धतीने पुनर्विकास करुन नागरीकांना घरे उपलब्ध करुन देण्याकरीता धोकादायक इमारतीतील रहिवाशांचे संक्रमण शिबीरात स्थलांतरीत करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु शासनाकडे म्हाडा अंतर्गत संक्रमण शिबीरांची संख्या अत्यंत अपुरी असून जी संक्रमण शिबीरे उपलब्ध आहेत, त्या संक्रमण शिबीराची ठिकाणे मुंबईच्या उपनगराततील दुरच्या ठिकाणी असल्याने मुंबई शहरातील रहिवाशांच्या मुलांच्या शैक्षणिक सोयी -सुविधांचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे धोकादायक इमारतीतील रहिवाशी उपनगरातील संक्रमण शिबीरात स्थलांतरीत होण्यास नकार देतात, अशी माहिती म्हाडाच्या अधिकार्‍यांनी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना दिली.