Share Market Latest Update : तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे का? बाजारातले टेक्निकल इंडिकेटर देखील बुचकळ्यात टाकणारे असल्यामुळं छोट्या ट्रेडर्सना स्टॉपलॉस शिवाय ट्रेडिंग करुच नका. थोडक्यात शुक्रवारी शेअर बाजारात ट्रेडिंग करणार असाल तर आधीच सावध व्हा. मोठे चढउतार असले की इंड्र डे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मोठी संधी मानली जाते. पण आज तसे करणे आज चांगलेच जोखमीचे ठरु शकते. बक्कळ नफा कमावण्याच्या नादात तुम्ही तुमचे मुद्दलच गामावून बसाल. तेव्हा आज बाजार सुरु होण्याआधीच जरा इकडे लक्ष द्या!
अमेरिकेतील महागाईचे आकड्यांमुळे व्याजदर कपात लांबण्याची शक्यता आहे. भारतातील दोन सर्वात मोठ्या आयटी कंपन्यात इन्फोसिस आणि टीसीएसने काल संध्याकाळी चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाही निकाल जाहीर केले आहेत. निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकामध्ये टीसीएस आणि इन्फोसिस हे दोन्ही वजनदार समभाग आहेत. त्यामुळे निकालांचा परिणाम बाजारावर होणार निश्चित आहे.
आता तो सकारात्मक होतोय की नकारात्मक यावर बाजाराची आजची आणि पुढील काही दिवसांची दिशा ठरणार आहे. त्यामुळे बाजारात ट्रेडिंगचा पहिला तास आणि शेवटचा तास दोन्ही अत्यंत व्होलेटाईल म्हणजेच मोठ्या चढउतराचे ठरतील असा ट्रेडिंग एक्सपर्टचा अंदाज आहे.
कालच्या ट्रेडिंग सत्रात दुपारी दोनच्या सुमारास एक मोठं करेक्शन आलं. त्यामुळे निफ्टी 21 500च्या खाली आला. बाजार बंद होताना पुन्हा एकदा उसळी मारून 21 650च्या वर बंद झाला. त्यामुळे वरच्या स्तरावर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी नफा वसूली होत असल्याचं पुढे आलं.
आज टीसीएस आणि इन्फोसिसच्या निकालानंतर बाजाराने उसळी मारली तरी वरच्या पातळीवर नफा वसुली येईल असं काही टेक्निकल तज्ञांचं मत आहे. तर काहींच्या मते 21750चा तांत्रिक अडथळा पार करुन बाजार टिकल्यास पुन्हा एकदा 21800 नंतर नवा उच्चांक प्रस्थापित होईल असंही काही टेक्निकल तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे नेमंक काय करायचं हे ठरवण्याआधी किती जोखमी घ्यायची याचा निर्णय घेऊन छोट्या ट्रेडर्सना स्टॉपलॉस शिवाय ट्रेडिंग करुच नका असा सल्ला बाजार तज्ज्ञांनी दिला आहे.